मुंबई : वृत्तसंस्था
महिला दिनाच्या दिवशी राज्यातील लाडकी बहिण योजनेत वाढ होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असतांना आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत सध्या पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० दिले जातात. मागील निवडणुकीत या रकमेत वाढ करून ₹२,१०० करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, राज्याच्या आर्थिक स्थितीमुळे या रकमेत वाढ करणे सध्या शक्य नसल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने पात्र लाभार्थींच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्रितपणे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ७ मार्च २०२५ पर्यंत या महिलांच्या बँक खात्यात एकूण ₹३,००० जमा केले जातील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.अर्थात, सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे योजनेच्या रकमेत वाढ करणे शक्य नसले तरी, सरकार महिलांच्या सन्मान निधीचे वितरण नियमितपणे करण्यासाठी प्रयत्नशील आहे.