रावेर : प्रतिनिधी
वाघोद्याहून निंभोऱ्याकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत कपील अशोल वारके (३०) हा युवक ठार झाला आहे. कपिल याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दि. ७ रोजी सायंकाळी धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मयत कपिल वारके यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन रावेर येथे करण्यात आले. यानंतर दि. ८ मार्च शनिवार रोजी सकाळी १० वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात निंभोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पक्षात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.