• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात भरधाव डंपरने सायकलस्वाराला चिरडले !

editor desk by editor desk
March 7, 2025
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
धरणगावात भरधाव डंपरने सायकलस्वाराला चिरडले !

धरणगाव : प्रतिनिधी 

वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिल्याने सायकलस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. जळगाव रोडवर असलेल्या महावीर जिनिंगच्या समोरच हा भीषण अपघात झाला. बांभोरी ते धरणगाव दरम्यान या चालकाने बेदरकारपणे डंपर चालवून अनेक वाहनांना कट मारले. हे सर्व भयभीत वाहनचालकांना पुढे आल्यावर हा अपघात दिसला.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील रहिवासी दत्तात्रय शंकर पाटील (वय-65) हे जिनिंग मध्ये रात्रपाळी वाचमन म्हणून काम करतात. आज गुरूवारी रात्री 7.30 वाजता ते धरणगाव कडून जिनिंग मध्ये कामासाठी सायकल वरून जात होते. याच वेळी जळगाव कडून वाळूने भरलेला डंपर (MH04/FJ8083) भरधाव वेगाने आला आणि सायकलस्वारला धडक दिली. अपघात एवढा भिषण होता की सायकल आणि सायकलस्वाराला 500 मीटर पर्यंत फरफटत नेले. या अपघातात सायकलस्वार दत्तात्रय पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. मागून येणारे माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, प्रतिक जैन, स्वप्नील भोलाणे यांनी मृत दत्तात्रय पाटील यांना ओळखले आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली. शिवसैनिक पाटील यांनी जखमी दत्तात्रय पाटील यांना आपल्या वाहनातून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.

मृत दत्तात्रय पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन असा परिवार आहे. समाजीक कार्यरत नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या दत्तात्रय पाटील यांच्या अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच ग्रामीण रुग्णालय परिसरात प्रचंड मोठा जमाव जमला. डंपर वाळूने भरलेला असून चालक फरार आहे. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दिली. मृत दत्तात्रय पाटील हे एसटी चालक समाधान पाटील यांचे वडील होत.

Previous Post

…तेव्हा पण माझा तसाच छळ झाला : ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा !

Next Post

बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, पालकमंत्र्यांकडून दुःख व्यक्त !

Next Post
बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, पालकमंत्र्यांकडून दुःख व्यक्त !

बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, पालकमंत्र्यांकडून दुःख व्यक्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्र्यांनी दिला धीर !
जळगाव

अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्र्यांनी दिला धीर !

May 8, 2025
महत्वाची बातमी : देशातील ‘हे’ विमानतळ आदेश येईपर्यत बंद !
क्राईम

महत्वाची बातमी : देशातील ‘हे’ विमानतळ आदेश येईपर्यत बंद !

May 8, 2025
अजित पवारांसोबत जाण्याचा सुळे घेणार निर्णय : शरद पवारांची माहिती !
क्राईम

अजित पवारांसोबत जाण्याचा सुळे घेणार निर्णय : शरद पवारांची माहिती !

May 8, 2025
मोठी बातमी : ‘ऑपरेशन सिंदूर’, 100 दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

मोठी बातमी : ‘ऑपरेशन सिंदूर’, 100 दहशतवाद्यांचा खात्मा !

May 8, 2025
अजित डोभाल यांना आला फोन : “साहेब, आता तरी माफ करा…” !
क्राईम

अजित डोभाल यांना आला फोन : “साहेब, आता तरी माफ करा…” !

May 8, 2025
वाघाने फक्त पंजा उगारला आहे, अजून जबडा उघडायचा आहे !
राजकारण

वाघाने फक्त पंजा उगारला आहे, अजून जबडा उघडायचा आहे !

May 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group