पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील तामसवाडी येथे ३० वर्षीय तरुणाचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. दीपक प्रकाश मोरे असे मयत तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तामसवाडी येथील बोरी नदीच्या किनारी ६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास दीपक प्रकाश मोरे (वय ३०) या तरुणाने विषारी औषध सेवन केले होते. त्यानंतर तो रस्त्याच्या कडेला पडलेला होता. रस्त्याने जाणाऱ्या हा तरुण अत्यावस्थ दिसल्यानंतर त्यांना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत रमेश दिलबर मोरे यांच्या माहितीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पारोळा पोलीस करीत आहेत.