अमळनेर : प्रतिनिधी
गलवाडे-अमळनेर रस्त्यावर एका मद्यधुंद दुचाकीस्वाराने स्कूटीला जोरदार धडक दिली. यात स्कूटीचालक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाडसे रेल्वे स्टेशन मास्टर मच्छिंद्र रतिलाल पाटील (वय ३८) बुधवारी स्कूटीवरून गलवाडेकडून अमळनेरकडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकी (एम.एच. १९ बी.व्ही. ४८५०) वरील चालक विनोद दगडू पाटील (रा. सबगव्हाण) याने मद्याच्या धुंदीत जोरदार धडक दिली. यात मच्छिंद्र पाटील यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात स्कूटीचेही नुकसान झाले आहे. मच्छिंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास हे. कॉ. शरीफखान पठाण करीत आहेत. मद्यधुंदीत वाहने चालविल्याने अपघात होतात. यामुळे अशा चालकांवर कारवाई मागणी होत आहे.


