Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आकाशवाणी चौकात भीषण अपघात : महिला जखमी !
    क्राईम

    आकाशवाणी चौकात भीषण अपघात : महिला जखमी !

    editor deskBy editor deskMarch 7, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील आकाशवाणी चौकात भुसावळकडून खोटेनगरकडे जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकचा कट लागला. त्यामुळे दुचाकीवरील महिलेचा तोल जावून ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. या प्रकरणी ट्रक चालकावर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चंपालाल पाटील व रागिणी चंपालाल पाटील हे दांम्पत्य भुसावळहून जळगाव शहरातील खोटेनगर भागातील एका रुग्णालयात उपचारासाठी येत होते. त्यात आकाशवाणी चौकात सायंकाळी ५.३० वाजता सिग्नल सुटल्यानंतर मजूर फेडरेशनच्या बाजूला चंपालाल पाटील यांच्या दुचाकीला ट्रकचा कट लागला.

    महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच असून, जानेवारी महिन्यात ७जणांचा बळी गेला होता. तर फेब्रुवारी महिन्यातही ४ जणांचा बळी गेला होता. बुधवारी रात्री शिवकॉलनी स्टॉपजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा अपघात होऊन, महिला गंभीर जखमी झाली आहे. २४ तासाच्या आत महामार्गावर दुसरा अपघात झाला आहे. ट्रक चालकाला जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा ट्रक देखील पोलिसांनी जमा केला आहे.  दुचाकीवरील रागिणी पाटील या रस्त्यावर कोसळल्या, मात्र त्याचवेळी त्यांचा हात व पाय ट्रकच्या मागील चाकाखाली दाबला गेला. यामुळे त्यांच्या हाताला व पायाचा अक्षरश चेंदामेंदा झाला. वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून रागिणी पाटील यांना जीएमसीत दाखल केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.