जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे मंगळवार दि. ४ मार्च रोजी आठवडे बाजाराच्या दिवशी एकाच समाजातील दोन गटात उधारीच्या पैशांवरून वाद निर्माण झाला. याच वादातून दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली यात अनेक जण जखमी झाले. याप्रकरणी दोघं गटातील एकूण २७ जणांविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, यासीन चाँद पिंजारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, यामध्ये त्यांचा भाऊ रशीद पिंजारी याचेकडे जाकीर कालू कुरेशी, साकीर कालू कुरेशी यांची मटनाचे चारश रुपये उधारी होती. यातून वाद निर्माण झाला कालांतराने जाकीर व साकीर यांनी गैरकायदेशिर मंडळी जमा करून हातात फायटर सुरी, लोखंडी रॉडने हल्ला करून रशीद चाँद पिंजारी यास गंभीर जखमी केले. तसेच मध्यस्थीसाठी आलेल्यांना बेदम मारहाण करून जखमी केले. तर दुसऱ्या गटातील शाकीर कालू कुरेशी याच्या फिर्यादीनुसार त्याने रशीद चाँद पिंजारी याचेकडून बांधकामासाठी लाकडी सेंट्रींग भाडयाने घेतली होती. त्याचे पैसे मागितले असता, त्यांच्यात वाद झाला. यामध्ये रशीद पिंजारी याने गैरकायदेशिर जमाव जमा करून माझ्या डोक्यात लोखंडी टॉमी मारुन गंभीर जखमी केले. तसेच त्यांचा भाऊ जफर याच्या पोटावर चावा घेत चाकूने वार केले.
पहिल्या गटातील जाकीर कुरेशी, साकीर कुरेशी, जफर कुरेशी, नसीम कुरेशी, खलील कुरेशी, कालू कुरेशी, एजाज कुरेशी, अरबाज कुरेशी, मासूम कुरेशी, भूऱ्या कुरेशी, सोनू कुरेशी, रशीद कुरेशी, रेहान कुरेशी यांच्यासह दुसऱ्या गटातील रशीद पिंजारी, निसार पिंजारी, यासीन पिंजारी, अरमान पिंजारी, सलमान पिंजारी, अलमा पिंजारी, शाहीन पिंजारी, शम्मो पिंजारी, गुड्डी पिंजारी, शानुर पिंजारी, बबलू पिंजारी, रहीम पिंजारी, सज्जो पिंजारी, हिना पिंजारी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास स.पो.निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहकों प्रविण चौधरी, गणी तडवी करत आहे