रावेर ; प्रतिनिधी
येथील सलमा बी अब्दुल रहीम (वय ३४) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ४ रोजी घडली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मन्यार वाडा भागातील रहिवासी सलमा बी अब्दुल रहीम (वय ३४) या विवाहित महिलेने काल दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत शेख इम्रान शेख शकील राहणार बंगाली कॉलनी खंडवा मध्यप्रदेश यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.