• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अरे बापरे! पिस्तुलाचा धाक दाखवत बँक व्यवस्थापकाला तीन जणांनी लुटले; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 22, 2022
in क्राईम, जळगाव
0

प्रविण पाटील प्रतिनिधी । विटनेर रस्त्यावर डोक्यावर पिस्तुलाचा धाक दाखवत खाजगी बँक व्यवस्थापककडून बॅगेतील  रोकड आणि मोबाईल टॅब असा एकुण १ लाख १४ हजार ६२९ रुपयांच्या मुद्देमालाची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार विटनेर गावाच्या रस्त्यावर घडला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात  अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील शेषराव पाढाळे (वय-२६) रा. रहिमाबाद ता. सिल्लोड जि.औरंगाबाद ह.मु. हिवरखेडा रोड जामनेर हे जामनेर येथील क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड अर्थात एनबीएफसी या बँकेत केंद्र व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहे. त्यांच्या बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना लघु उद्योगासाठी कर्ज दिले जाते. दिलेले कर्ज वसुलीसाठी त्यांनी शाखेमार्फत १० कर्मचारी नेमण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून ते जिल्ह्यातील ३५ केंद्रातून माध्यमातून बचत गटातून पैसे वसूलीचे काम करतात. सुनील पाढाळे हे मंगळवारी २२ मार्च रोजी कर्जाची रक्कम वसूली करण्यासाठी वराडमार्गे लोणवाडी येथे दुचाकी क्रमांक (एमएच २० डीजे १६६०) वरून गेले. त्यांनी पाच महिलांकडून एकूण ९५ हजार ८७३  रुपयांची वसुली करून दुपारी १२ वाजेच्या सुमारास वरडमार्गे विटनेरकडे दुचाकीने निघाले. दुपारी १ वाजेच्या सुमारास वराड आणि विटनेर गावाच्या रस्त्यावर असलेल्या रस्त्याने जात असताना त्यांच्यामागून अज्ञात तीन व्यक्ती दुचाकीने पाठलाग करत आले. पुढे सुनील पाढाळे यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे गेले. आणि तिघे दुचाकी समोर अचानक आल्याने सुनील यांनी अचानक ब्रेक लावला व ते खाली पडले. त्यानंतर दुचाकीवरील तिघांनी त्यांच्याजवळ येऊन २ चापटा मारल्या व त्यांच्या खांद्याला लावलेले पैशांची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुनील यांनी याला विरोध केला असता त्यातील एकाने कमरेतून पिस्तूल काढून त्यांच्या डोक्याला लावली. म्हणाला की, “बॅग सोड नाहीतर गोळी मारेल” अशी धमकी दिली. पैश्यांची बॅग जबरी हिसकावून दुचाकीवरून पसार झाले. या बॅगमध्ये ९५ हजार ८७३ रुपयांची रोकड आणि सुनील यांचा १८ हजार ७५६ रुपये किमतीचा मोबाईल टॅब असा एकूण १ लाख १४ हजार ६२९ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी सुनील पाढाळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, सपोनि अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, स्वप्नील पाटील, हेमंत पाटील, प्रदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार घटनास्थळी धाव घेवून माहिती जाणून घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास  पोउनि रवींद्र गिरासे, सचिन मुंडे करीत आहे.

Previous Post

शिरसोली रोडवरील कृष्णा गार्डनसमोरून तरूणाच्या दुचाकीची चोरी

Next Post

कर्ज भरणा करण्यासाठी जिल्हा बँक मार्चअखेर सरू राहणार

Next Post
जिल्हा बँकेला ईडीची नोटीस?

कर्ज भरणा करण्यासाठी जिल्हा बँक मार्चअखेर सरू राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group