पाचोरा : प्रतिनिधी
शहरात ४२ वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील आशिर्वाद ड्रिमसिटी मधील रहिवासी वैशाली अनिल पाटील (वय – ४२ वर्ष) या विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविल्याची खळबळजनक घटना २ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. वैशाली पाटील व पती अनिल पाटील यांचे किरकोळ कारणावरून नेहमी वाद होत असत. पती अनिल पाटील याचे कडुन वैशाली हिस शिविगाळ व मारहाण होत असे. नेहमीच्या वादाला कंटाळून अखेर वैशाली पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
दरम्यान घटनेची माहिती वैशाली यांच्या माहेरच्या मंडळींना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन एकच आक्रोश करत पती अनिल भानुदास पाटील व छबाबाई भानुदास पाटील हेच वैशाली हिच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचे बोलत होते.
दरम्यान वैशाली हिचा भाऊ गजानन भास्कर पाटील रा. लोंढ्री ता. जामनेर यांचे फिर्यादीवरून अनिल भानुदास पाटील (पती) व छबाबाई भानुदास पाटील (सासु) यांचे विरुद्ध वैशाली हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे हे करीत आहे.