रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील सातपुडा पर्वत भागातील अहिरवाडी व पाडळे खुर्द वनविभागाच्या कंपार्टमेंट मध्ये सुमारे वीस हजार रुपये किमतीचा १६५ किलो डिंक जप्त केला याप्रकरणी डींक चोरी करणारे दोन मोटरसायकल सह मुद्देमाल सोडून पसार झाले.
सविस्तर वृत्त असे कि, सातपुडा पर्वतातील अहिरवाडी येथील सेक्टर क्रमांक पाच मध्ये वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना मोटर सायकलवरून लिंक नेतांना अज्ञात इसम आढळून आले. मोटरसायकल स्वरांचा पाठलाग केला असता ते पळून गेले. या कारवाईत दहा हजार ८७० रुपये किमतीचा ९८ किलो सलई डिंक तसेच एम एच १९ ए जी १७२३ ही पंधरा हजार रुपये किमतीची मोटरसायकल तसेच सेक्टर क्रमांक आठ मध्ये ४७ किलो सल्डिंग ५१७० रुपये किंमत व जुनोने येथील सेक्टर क्रमांक सात मध्ये चार हजार रुपये किमतीचा २० किलो धावडा डिंक तसेच एम पी १० बी ए १४६९ ही मोटरसायकल असे २० हजार ४० रुपये कीमतीचा १६५ किलो डिंक व ५३ हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकली असा ७३ हजार रुपये विमतीचा मुद्देमाल वन कर्मचाऱ्यांनी जप्त केला. वनक्षेत्रपाल अजय बावणे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल राजेंद्र सरदार (अहिरवाडी), वनरक्षक आयेशा पिंजारी (अहिरवाडी ), सविता वाघ (पाडळे खुर्द), वनमजूर सुभाष माळी, इनुस तडवी, विनोद पाटील यांनी कारवाई केली. सदर मुद्देमाल रावेर येथील वन विभागाच्या आगारात जप्त करण्यात आलेला आहे.