चाळीसगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आज दि.४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ ट्रक आणि आयशरची समोरासमोर झालेल्या भीषण आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. यावेळी जेसीबीच्या माध्यमातून जखमींना अपघातग्रस्त वाहनातून काढण्यात आले. याप्रसंगी रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. समाधान मेघराज पाटील गाव सार्वे ह.मु.तांबोळा खुर्द असे मयत चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ ट्रक क्रमांक (एमएच १९ झेड ४७५८) आणि आयशर क्रमांक (एमएच १९ सीवाय ०७०४) यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी ४ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. या भीषण अपघातात आयशर चालक समाधान पाटील याचा जागेवर मृत्यू झाला तर ट्रक चालकासह इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा समोरील बाजूचा चुराडा झाला तर जखमींना जेसीबी आणि क्रेनच्या मध्यमातून बाहेर काढण्यात आले. जखमी झालेल्यांना चाळीसगाव उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरीक आणि पोलीसांनी धाव घेवून बचाव कार्य सुरू केले. या भीषण अपघातामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती. त्यानंतर पोलीसांच्य मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसात या घटनेबाबत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.