Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » काकांचा नेता दादांच्या चारचाकीत ? पक्ष प्रवेशाची जोरदार चर्चा !
    राजकारण

    काकांचा नेता दादांच्या चारचाकीत ? पक्ष प्रवेशाची जोरदार चर्चा !

    editor deskBy editor deskMarch 2, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीमध्ये जात असतांना आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी देखील अजित पवार यांच्यासोबत पुण्यात एकाच गाडीतून प्रवास केला. या दोघांमध्ये दहा मिनिटे चर्चा झाली. यावेळी जाणकार यांच्यासोबत उमेश पाटील देखील उपस्थित होते. त्यामुळे आता या घडामोडीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

    उत्तम जानकर आणि अजित पवार यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र यावर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील उजनी धरणातून पंधरा दिवस आधी पाणी सोडण्याची जानकर यांनी मागणी केली असल्याचे सांगितले आहे. इतकेच नाही तर अजित पवार यांना भेटणाऱ्या लोकांची मोठी गर्दी होती. गर्दीमुळे अजित पवार यांच्या गाडीत बसूनच या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती देखील उमेश पाटील यांनी दिली आहे.

    उत्तम जानकर हे शरद पवार गटाचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम विरोधात पुकारण्यात आलेला आंदोलनात उत्तम जानकर सर्वात आघाडीवर होते. त्यांच्या मतदारसंघातच बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी सर्वात आधी करण्यात आली होती. या घटनेची चर्चा देशभर झाली होती. त्यातच त्यांनी आता अजित पवार यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या आधी देखील राज्य सरकारने जयंत पाटील आणि उत्तम जानकर यांच्यासाठी पीएच नियुक्ती केली आहे. त्या पीएचा खर्च सरकारी तिजोरीतून केला जाणार आहे. या सर्व घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि उत्तम जानकर यांची भेट आणि त्यामागे असलेल्या राजकारण यावर आता चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठवाडा पुन्हा हादरला : हिंगोलीत 4.7 तीव्रतेचा भूकंप; नागरिकांत भीती !

    April 11, 2026

    खरीप हंगाम २०२६ : जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

    April 10, 2026

    “धनंजय मुंडेंना मंत्री केल्यास सत्ता जाईल” : करुणा मुंडे शर्मा यांचा महायुतीला थेट इशारा !

    April 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.