Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुक्ताईनगर यात्रेदरम्यान तरुणांनी काढली केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड
    क्राईम

    मुक्ताईनगर यात्रेदरम्यान तरुणांनी काढली केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड

    editor deskBy editor deskMarch 2, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :  प्रतिनिधी

    भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी यात्रेदरम्यान छेड केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी टवाळखोरांच्या अटकेसाठी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी ठिय्या मांडला आहे. या नुकत्याच समोर आलेल्या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

    केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी याबद्दल महिला आणि मुली घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आक्रमक पावित्रा घेतला आहे. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव पाहायला मिळत आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमच्यासारख्या परिवाराच्या मुली जर सुरक्षित नसेल तर बाकीच्यांचं काय, असा सवाल केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केला आहे.

    यावेळी माध्यमांशी बोलतांना रक्षा खडसे म्हणाल्या कि कोथळी येथे दरवर्षाप्रमाणे यात्रा भरते माझी मुलगी हि शुक्रवारी यात्रेत गेली असता तिची काही टवाळखोर तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार घडला असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आपण मुली सोबत आल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सागितले .

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.