• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुलीला रेल्वेत नोकरी लावून देतो : वडिलांची १० लाखात फसवणूक !

editor desk by editor desk
March 2, 2025
in क्राईम, जळगाव, जामनेर
0
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

जामनेर : प्रतिनिधी

पहूर येथील येथील शेतकरी गजानन तुळशीराम पाटील यांना दोन जणांनी मुलीला रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून दहा लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी पहूर पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आली आहे, तर दुसरा फरार आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जितेंद्र भागवत थाटे (३५, रा. विवेकानंद नगर, जळगाव) आणि तुषार दीपक गावंडे (३०, रा. गिरिजा कॉलनी जामनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापैकी तुषार हा अटकेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहूर येथील शेतकरी गजानन तुळशीराम पाटील हे परिवारासह वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी रेल्वेच्या नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. पाटील यांच्या पत्नीच्या कार्यालयात ज्ञानेश्वर तुकाराम महाले नोकरीला आहेत. यांच्याबरोबर मुलीच्या नोकरीची चर्चा झाली. त्यांनी रेल्वेत नोकरीला लावून देणाऱ्या वरील दोघांची माहिती दिली. गजानन पाटील व पत्नी दोघेही या युवकांना भेटले. त्यांनी नोकरी लावून देतो. रेल्वे विभागात आमची पक्की ओळख असल्याचे पाटील दाम्पत्याला सांगितले. इतर युवकांच्या नियुक्तीचे बनावट प्रमाणपत्र त्यांनी दाखवले.

गजानन पाटील यांनी बँक खात्यातून १२ ऑक्टोबर २०२२ ते १० मार्च २०२३ पर्यंत दहा लाख या संशयितांना दिले. पण दोन वर्षे उलटूनही नियुक्ती पत्र मिळत नसल्याने पाटील यांनी युवकांकडे तगादा लावला. त्यावर संबंधितांनकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. जितेंद्र व तुषार यांनी त्यांचे धनादेश दिले मात्र बँकेत धनादेश वटले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी पहूर पोलिसात वरील दोघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

लोकांच्या सेवेसाठी पदोन्नती किंवा संपत्तीत वाढ होण्याची शक्यता !

Next Post

भरदुपारी दुकानाला भीषण आग : लाखोंचे नुकसान

Next Post
भरदुपारी दुकानाला भीषण आग : लाखोंचे नुकसान

भरदुपारी दुकानाला भीषण आग : लाखोंचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group