Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ट्रकच्या जबर धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार तर एक जखमी !
    क्राईम

    ट्रकच्या जबर धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार तर एक जखमी !

    editor deskBy editor deskMarch 1, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहरापासून जवळ असलेल्या ममुराबाद येथील अरूणामाई कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात दुचाकीने जात असलेल्या दोन जणांनान भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने फार्मसी महाविद्यालयातील तरूण हा जागीच ठार झाला तर त्याचा सोबतचा मित्र हा गंभीर जखमी झाला आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मास्टर कॉलनीत फैसज पटेल हा तरूण आपल्या आईवडील व मोठे काका यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो ममुराबाद येथील अरुणामाई कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात बी-फार्मसीच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे शनिवारी १ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फैसल हा त्याचा मित्र वासीक याच्यासोबत दुचाकीने जळगावकडून महाविद्यालयाला जात होता. त्यावेळी ममुराबाद आणि जळगाव दरम्यानच्या रस्त्यावरून जात असतांना समोरून विटाने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच १३ एएन ४४४५) जोरदार धडक दिली.

    या वाहनात विटा भरलेले होते. या भीषण अपघातात फैसलचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सोबत असलेला वासीक हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली होती. दरम्यान फैजल हा घरातील एकुलता एक मुलगा असल्याने आई-वडिलांसह त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे दिसून आले. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.