• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नातेवाईकाच्या घरात घुसून भामट्याने लाख रुपयांची दागिने पळविले !

editor desk by editor desk
March 1, 2025
in क्राईम, चाळीसगाव
0
महिलेचा सोन्याचे नेकलेस चोरी ; अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल !

चाळीसगाव : प्रतिनिधी

नातेवाईक असून घराकुलाचे कागद कपाटात असल्याचे भासवत घरात घुसून अज्ञात भामट्याने कपाटातील लॉकर तोडून त्यातील १ लाख २० हजारांची सोन्याची पोत चोरून दुचाकीवरून पळ काढल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील तरवाडे पेठ येथे दिवसाढवळ्या घडला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरवाडे पेठ येथील विजय पद्माकर अमृतकार यांच्या मातोश्री व त्यांची लहान मुलगी घरात होते, तर इतर कुटुंबीय शेतात गेले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अंदाजे २५ ते २८ वयाचा अनोळखी तरूण घरी आला. मी नांदेड येथून आलो असून तुमच्या सुनेचा नातेवाईक असून घरातून कागदपत्रे घेण्यास सांगितले आहे. तर ही कागदपत्रे कपाटात असल्याचे सांगून हा भामटा घरात घुसला. मात्र, कपाटाची चावी आपल्याजवळ नाही, असे विजय अमृतकार यांच्या आईने सांगितले. त्यानंतर भामट्याने लोखंडी रॉडने कपाटाचे लॉकर तोडून त्यातून सोन्याची ४ तोळ्याची पोत चोरून घराबाहेर लावलेल्या दुचाकीवरून पळ काढला. विजय अमृतकार यांच्या आई व मुलगी घरात दोघेच असल्याने घाबरल्यामुळे त्यांनी आरडाओरड केली नाही. तर भामटा पळून गेल्यावर त्यांनी शेजाऱ्यांना हा प्रकार सांगितला. तर घरातील सदस्य घरी आल्यानंतर कपाटातून १ लाख २० हजाराची सोन्याची पोत भामट्याने गायब केल्याचे समोर आले. हा प्रकार २५ रोजी दुपारी अडीच वाजता घडला. या प्रकरणी विजय अमृतकार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

तरुण शेतमजुराने घेतला टोकाचा निर्णय !

Next Post

स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरण : दोघात पैशांचा वाद अन मग बलात्कार !

Next Post
स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरण : दोघात पैशांचा वाद अन मग बलात्कार !

स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरण : दोघात पैशांचा वाद अन मग बलात्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली मारहाण !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group