Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पत्नीला पहाटेच दिसला पतीचा मृतदेह !
    क्राईम

    पत्नीला पहाटेच दिसला पतीचा मृतदेह !

    editor deskBy editor deskMarch 1, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    दोन महिन्यांपूर्वी नवीन घरात राहण्यासाठी आलेल्या एका ३२ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता बिबानगर येथे उघडकीस आली. सकाळी पत्नी झोपेतून उठल्यानंतर पतीचा गळफास घेतलेला मृतदेह दिसला. मृतदेह पाहताच पत्नीने आक्रोश केला. यासंदर्भात तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, समाधान रमेश शिरसाठ (वय ३२, रा. डांगरी, ता.अमळनेर, ह.मु. बिबानगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते महावितरण कंपनीत वायरमन म्हणून नोकरीला होते. समाधान शिरसाठ यांनी घरात सर्वजण झोपलेले असताना राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता त्यांच्या पत्नीच्या लक्षात आली. पत्नीचा आवाज ऐकताच शेजारी असलेले रहिवासी धावत आले. समाधान शिरसाठ यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता मयत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, चार विवाहित बहिणी, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.