Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » …म्हणून कुत्र्याला दोरी बांधून दुचाकीने ओढले !
    क्राईम

    …म्हणून कुत्र्याला दोरी बांधून दुचाकीने ओढले !

    editor deskBy editor deskFebruary 28, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    एका कुत्र्याने बकरीचा चावा घेतला म्हणून, बकरीच्या मालकाने कुत्र्याला चक्क मोटारसायकलला बांधून फरफटत ओढल्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी सकाळी १०:१५ वाजता डीमार्ट समोर घडला. एका युवकाच्या सतर्कतेमुळे कुत्र्याचा जीव वाचला असला तरी कुत्र्याला ओढत नेल्याने कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मोटारसायलस्वारावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भाग्येश आनंदराव मगर हा युवक शिरसोली रस्त्याने जात असतानाच सलीम अन्सारी (रा.तांबापुरा) हा व्यक्ती एका जीवंत कुत्र्याला (एम.एच.१९, डी.डी. ७८६५) मोटारसायकलला बांधून फरफटत नेत असल्याचे दिसून आले. भाग्येशने सलीम अन्सारीची मोटारसायकल थांबवून, त्याला मोटारसायकलला बांधलेल्या कुत्र्याला सोडण्यास सांगितले.

    याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलीमने ‘माझ्या बकरीला, या कुत्र्याने चावा’ घेतला असल्याचे सांगितले. त्यावेळेस कुत्रा मोठ्या प्रमाणात जखमी झाला असल्याने कुत्र्याला उपचाराची गरज होती. त्यामुळे भाग्येशने सलीमला विनंती करून कुत्र्याला मोकळे केले. त्यानंतर मित्रांच्या सहाय्याने जखमी कुत्र्याला उपचारासाठी महाबळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, प्राण्यांच्या छळ केल्याप्रकरणी भाग्येश मगर यांच्या फिर्यादीने सलीम अन्सारी याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.