• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खळबळजनक : आधी मुलाचा केला खून नंतर बापाने संपविले आयुष्य !

editor desk by editor desk
February 28, 2025
in एरंडोल, क्राईम, जळगाव
0
खळबळजनक : आधी मुलाचा केला खून नंतर बापाने संपविले आयुष्य !

एरंडोल : प्रतिनिधी

मुलाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून माजी सैनिक असलेल्या बापाने त्याचा गळा आवळून खून करत स्वतःही आत्महत्या केली. अंगावर काटा आणणारी ही घटना एरंडोल येथे गुरुवारी उघडकीस आली. बापाच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवर त्यांनी मुलाचा खून करून तो पुरल्याची माहिती दिली. मुलगा सोशल मीडियावर रिल्स बनवायचा. विठ्ठल पाटील ५०) आणि हितेश पाटील (२२) अशी या मृत बाप-बेट्यांची नावे आहेत. माजी सैनिक विठ्ठल पाटील हे भवरखेडा (ता. एरंडोल) येथील मूळ रहिवासी असून ते आपल्या परिवारासह एरंडोल येथील वृंदावन नगरात वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा हितेश विठ्ठल पाटील हा रिल्स बनवायचा. मात्र, तो वडिलांपासून वेगळा राहत होता. तो वडिलांचा छळ करून मारहाण करत होता. या प्रकाराला कंटाळून विठ्ठल पाटील यांनी मुलाचा खून करत स्वतः ही आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल पाटील यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली. त्यात हितेश हा दारू पिऊन आपणास मारहाण करत होता. त्यास कंटाळून भवरखेडा गावानजीकच्या एका नाल्याजवळ त्याचा खून केला व मृतदेह जमिनीत पुरला आहे, असे सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आढळले. गुरुवारी हितेश पाटील याचा मृतदेह भवरखेडा येथील नाल्यात आढळून आला. तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी सुती दोरी आढळून आली. या दोरीनेच विठ्ठल पाटील यांनी मुलाला फाशी दिली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

जुनाट आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना आरोग्यात आराम मिळेल.

Next Post

…म्हणून कुत्र्याला दोरी बांधून दुचाकीने ओढले !

Next Post
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

...म्हणून कुत्र्याला दोरी बांधून दुचाकीने ओढले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group