• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींकडून वाहने शासन जमा; आजपासून प्रशासकाची नियुक्ती

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 21, 2022
in जळगाव, राजकारण
0

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल २० मार्च रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे सोमवारी २१ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अन्य सभापतींची वाहने प्रशासनाकडे जमा करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाल संपुष्टात आला असून बऱ्याच ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गट, गणाच्या प्रारूप आराखडा रचनादेखील प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. परंतु ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यात येऊ नयेत यामागणीवरून राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या नव्याने अध्यादेश पारित केला. या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी करण्यात आली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात सर्वच प्रारूप आराखडा रचना रद्द करण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडल्या आहेत. तसेच जिल्हा परिषदेचा सन २०१७ ते २०२२ चा पंचवार्षिक कालावधी २० मार्च रोजी संपुष्टात आल्यामुळे जिल्हा परिषदेवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह ४ सभापतींची असे एकुण ६ वाहने लागलीच जिल्हा परिषद प्रशासनाकडे जमा करण्यात आली आहेत.

यात जिल्हा परिषद अध्यक्षांकडे असलेले वाहन क्रमांक (एमएच १९ सीव्ही ११६१) , उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापतींकडील (एमएच १९ सीयु ६५७७), शिक्षण आरोग्य सभापतीचे (एमएच १९ सीयु ५७४७), महिला बाल कल्याण व बांधकाम समिती सभापतीचे (एमएच १९ सीयु ५७४६), समाजकल्याण सभापतीचे एमएच (१९ सीयु ५७६७), आरोग्य समिती सभापतीचे (एमएच १९ एम ६९०), अशी प्रशासकीय वाहने जिल्हा परिषद प्रशासनाकडे जमा करण्यात आली आहे.

Previous Post

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या बुध्दीबळ संघाच्या कर्णधारपदी आकाश धनगर निवड

Next Post

फैजपूर येथील तरूण घरात चिठ्ठी लिहून बेपत्ता

Next Post

फैजपूर येथील तरूण घरात चिठ्ठी लिहून बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group