Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एमआयडीसी पोलिसांची कारवाई  : दोन बुलेट चोरांना ठोकल्या बेड्या !
    क्राईम

    एमआयडीसी पोलिसांची कारवाई  : दोन बुलेट चोरांना ठोकल्या बेड्या !

    editor deskBy editor deskFebruary 26, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील बाबा नगरातील रहिवाशी हर्षद नागपाल यांची बुलेट चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्याने एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारवरून दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या दोन बुलेट हस्तगत करण्यात आल्या आहे.त्यांच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, जिल्ह्यांमध्ये मोटरसायकली चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी गुन्हेशोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या होत्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील तपासी अंमलदार किशोर पाटील यांनी सिंधी कॉलनी येथील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या आधारे जावेद शेख चांद रा मास्टर कॉलनी आणि अदनान अमजद खान शाहूनगर या दोघांना गोपनीय माहितीच्या आधारे 22 फेब्रुवारी रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता 24 पर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. दोघांनी सिंधी कॉलनी येथील हर्षद दिलीप कुमार नागपाल यांची बाबा नगर येथील घरासमोरून 13 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री साडेदहा ते साडेपाच वाजेच्या सुमारास बुलेट चोरून नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच दोन्हीसंशयितांची चौकशी केली असता त्यांनी मास्टर कॉलनी येथून बुलेट चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या दोन बुलेट हस्तगत करण्यात आले आहे.

    हि कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके ,पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे ,पोलीस नाईक किशोर पाटील ,योगेश बारी, विकास सातदिवे, नितीन ठाकूर, नाना तायडे, किरण पाटील ,राहुल घेटे, आदींच्या पथकाने केली .

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.