पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील लोहारा येथे एकाच रात्रीत चोरट्यांनी सात ठिकाणी चोरी करीत पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून यामध्ये पाच दुकाने तर दोन घरांचा समावेश आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, बसस्थानक आवारात असलेले पवन मेडिकल, सारिका मोबाइल अॅड हार्डवेअर, चौधरी इलेक्ट्रॉनिक्स, ज्योती कृषी केंद्र, नवजीवन किराणा या दुकानांच्या शटरचे कुलूप गॅस कटरच्या सहाय्याने तोडून गल्ल्यातील रोख रक्कम व दुकानातील किमती वस्तू चोरून चोरट्यांनी पोबारा केला. यासोबतच राजेंद्र शेळके यांचे घरही चोरट्यांनी फोडले. कुटुंबीय बाहेरगावी असल्याने तेथे चोरट्यांनी घरातील कपाट उचकटून साहित्य अस्ताव्यस्त केले. मात्र, घरात त्यांच्या हाती काही लागले नाही.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, बॉबी या श्वानाला घेऊन हेकॉ संदीप परदेशी, पोहेकॉ मनोज पाटील, चालक नाना मोरे हे आले होते. पण ज्या दुकानात चोरी झाली आहे, या दुकानदारांनी अपेक्षित बंधन न पाळल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागते. दरम्यान, राजेंद्र शेळके यांच्या घरातील कपाट फोडून सामान अस्ताव्यस्त करण्यात आले होते