चोपडा : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गांजाची कारवाई सुरु असतांना नुकतेच चोपडा ते धरणगाव रोडवरील निमगव्हाण गावातील बसस्थानक समोरील हॉटेल मनोज समोरील रोडवर दुचाकीवरून गांजाची वाहतूक करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यानी ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दि.२३ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या आदेशानुसार स्थागुशा पथकातील पीएसआय. गणेश वाघमारे, अनिल जाधव, पो.हे.कॉ.दिपक माळी, पो.हे.कॉ. रवींद्र पाटील यांनी चोपडा ग्रामीण.पो.स्टे.गु. र.न.26/2025 NDPS अंतर्गत 22B,20,प्रमाणे चोपडा ते धरणगाव रोडवरील निमगव्हाण गावातील बसस्थानक समोरील हॉटेल मनोज समोरील रोडवर आरोपी नामे अमित दिलीप बरडे वय 22 वर्ष रा.जोगवाडा ता.नेवाली जि.बढवाणी म.प्र.हा त्याचे ताब्यातील मोटार सायकल Zupeter क्रमांक MP46 Zc6443 चे सिटखाली डीक्कीत पारदर्शक प्लास्टिक पिशवीत व गाडीचे पाय ठेवण्याची जागा पायदान जवळील एका गोणीमधुन असे एकुण 13 किलो गाजाची स्वताच्या फायद्यासाठी व चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करीत असताना स्वःताच्या जवळ बाळगताना मिळुन आला तसेच त्याच्या ताब्यात एकूण 13 किलो गाजाची किमत 124000,पाढरां रंगाची टिव्हीएस ज्युपीटर कंपनीची मोटरसायकल 50000 रूपये किमतीची व एक आय फोन कंपनीचा काळ्यारगाचा मोबाईल 60000 रूपये किमतीचा असा एकूण 244000 रूपये किमतीचा मुद्देमाल सह मिळुन आला म्हणुन त्यास ताब्यात घेवुन पुढील योग्य त्या कारवाई साठी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.