जळगाव : प्रतिनिधी
एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी विसनजी नगरातील स्वीट मार्टजवळ घडली. याप्रकरणी तरुणांविरुद्ध परस्परविरोधात दोघा दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील विदगाव येथील यश संजय कोळी (वय २०) आणि संशयित अरबाज खान (रा. धरणगाव) हे दोघे एकाच ठिकाणी कामाला आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता दोघेही कामावर असताना ‘औषधांचा ट्रे व्यवस्थित लाव’ असे सांगितल्याचे वाईट वाटल्याने अरबाज खान याने यश कोळी याला शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी यश कोळी याने दिलेल्या तक्रारीवरून अरबाज खान याच्यासह इतर दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तर धरणगाव येथील अरबाज खान फिरोज खान याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित यश संजय कोळी व कुणाल संजय कोळी यांच्यासह एक जण अशा तिघांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलिस कॉन्स्टेबल भारती देशमुख ह्या करत आहेत.