धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव-एरंडोल रस्त्यावरील अंबिकानगर येथे दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन चार जण गंभीर जखमी झाले होते. त्यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला.
सविस्तर वृत्त असे कि, या अपघातात पहिल्या दुचाकीवरील किरण पुंडलिक मराठे (३५, रा. बोरखेडा बुद्रुक) आणि दुसऱ्या दुचाकीवरील राकेश दुपसिंग बारेला (४५), शानूबाई राकेश बारेला (३५) आणि कानबाई राकेश बारेला (५ वर्ष, रा. चाचपणी, दुधखेडा बलवाडी, मध्य प्रदेश) हे जखमी झाले. यात शानूबाई हिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह धरणगाव रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे