जळगाव : प्रतिनिधी
एका गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकातील महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आठ महिलांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा शनिवारी दाखल झाला आहे. दरम्यान, यातील चार महिलांना याआधी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक झाली आहे. आता या गुन्ह्यातही त्यांना अटक होणार आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रामानंद नगरचे पोलिस पथक २० रोजी एका आरोपीला अटक करण्यासाठी पिंप्राळ्यातील हुडको भागात गेले असता तेथे जुन्या भांडणाच्या कारणावरून विद्या शंकर सोनवणे (वय २१) या तरुणीस व तिच्या कुटुंबाला घरात जाऊन मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. हा वाद मिटवत असताना लक्ष्मी अनिल हरताळे, ललित निळकंठ शिरसाठ, उज्ज्वला रमेश शिरसाठ, कोमल निळकंठ शिरसाठ, बेबाबाई वाघ, आक्का सुरवाडे व पूजा नामक महिलांनी स्वाती पाटील या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे केस ओढून जमिनीवर पाहून मारहाण केली. यात १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओढण्यात आले. याच वेळी पुरुष पोलिसांनाही शिवीगाळ करण्यात आली होती.