यावल : प्रतिनिधी
भालोद गावाजवळ मजुरांनी भरलेली चारचाकी उलटल्यामुळे त्यातील १८ जण जखमी झाल्याची घटना शनिवार दि. २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील हिंगोणा येथून काही मजूर भालोद येथे हरभरा कापणीसाठी जाताना ही घटना घडली. भालोद, ता. यावल गावाच्या पुढे चारचाकी वाहन उलटले. हे वृत्र वाऱ्यासारखे परिसरात पसरले. यामुळे नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींमध्ये लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत मजुरांचा समावेश आहे. अपघातात गोदीबाई बारेला, शारदा मुंगीलाल बारेला (वय १०), दिपाली जगदीश बारेला (वय ८), मंगू जगदीश बारेला (वय २०), प्रमिला बारेला (वय २१) आनंद सखाराम बारेला (५ महिने), उमेश जगदीश बारेला (वय १२ वर्ष), सखाराम गुजरिया बारीला (वय २०), ममता मांगीलाल बारेला (वय १२), संदीप मांगीलाल बारेला (वय ६), राणू मांगीलाल बारेला (वय ४), दिलीप बारेला (वय १८ वर्ष), कविता बारेला ( वय ५ वर्ष), गोदीबाई बारेला (वय ४२ वर्षे), सविता बारेला (वय ४६ वर्ष) नीरसा मांगीलाल बारीला (वय ३० वर्ष), दिनेश बारेला (वय १२) जगदीश बारेला (वय २५) यांचा समावेश आहे.