• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणांचा घोळका समुद्रात पोहचला अन घडला मोठा अनर्थ !

editor desk by editor desk
February 22, 2025
in क्राईम, राज्य
0
तरुणांचा घोळका समुद्रात पोहचला अन घडला मोठा अनर्थ !

मालवण : वृत्तसंस्था

पुणे, हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. एका युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज दि.२२ सकाळी ११. २० च्या सुमारास तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रकिनाऱ्यावर घडली. रोहित बाळासाहेब कोळी (वय २१), शुभम सुनील सोनवणे (वय २२) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हवेली तालुक्यातील कुश संतोष गदरे (वय २१), रोहन रामदास डोंबाळे (वय २०), ओंकार अशोक भोसले (वय २४) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, पुण्यातील युवक मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते. सकाळच्या सुमारास तारकर्ली पर्यटन विकास महामंडळाच्या नजीक असलेल्या समुद्रकिनारी हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते. यावेळी अचानक पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात ओढले गेले.

किनारावरील स्थानिकांनी तसेच पर्यटन व्यवसायिकांनी तात्काळ समुद्राच्या पाण्यात बचाव कार्य सुरू केले. बोटीच्या सहाय्याने बुडालेल्या युवकांचा पाण्यात शोध कार्य सुरू करण्यात आले. अखेर स्थानिकांकडून समुद्राच्या पाण्यात शोधकार्य सुरू असताना बुडालेल्या अवस्थेत तीनही युवक सापडून आले. त्यांना तत्काळ किनाऱ्यावर आणल्यावर रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्या आले. दरम्यान डॉक्टर आणि तपासणी केली असता रोहित कोळी व शुभम सोनवणे यांना मृत घोषित केले. मात्र, ओंकार भोसले हा अत्यवस्थ असून त्याच्यावर अधिक उपचार करण्यासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. बचाव कार्यात समीर गोवेकर, वैभव सावंत, दत्तराज चव्हाण, महेंद्र चव्हाण, रांजेश्वर वॉटर स्पोर्ट चे कर्मचारी सामील होते. मालवण पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

दोन दुचाकीसह एकाला घेतले भडगाव पोलिसांनी ताब्यात !

Next Post

दिवस तुमच्यासाठी समान लाभ आणि प्रगतीचा काळ असणार !

Next Post
या राशीतील लोकांनी प्रवास करणे टाळावे !

दिवस तुमच्यासाठी समान लाभ आणि प्रगतीचा काळ असणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group