जालना : वृत्तसंस्था
राज्यातील जालना येथे मजुराच्या पत्र्याच्या शेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाला. जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मध्यरात्री साडेतीन वाजता दुर्दैवी घटना घडली. महिला आणि १३ वर्षीय मुलीला वाचवण्यात यश आले, पण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. जाफराबाद तालुक्यातील पासोडी – चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम करणारे मजूर होते.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्र्याच्याशेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथील ही दुर्दैवी घटना घडली. मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमध्ये पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका तेरा वर्षीय मुलीला आणि एका महिलेला वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान जाफराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहे.
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम करणारे मजूर पुलाशेजारीच पत्र्याचं शेड बांधून राहत होते. मध्यरात्री गाढ झोपेत असतानाच एका वाळूच्या टिप्परने त्यांच्या पत्र्याच्या शेडशेजारी वाळू खाली केली. त्या वाळूमध्ये दबून या पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.