• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात संत तुकाराम महाराज बिजनिमित्त पालखी सोहळा उत्साहात

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 21, 2022
in धरणगाव, सामाजिक
0

धरणगाव प्रतिनिधी । संत तुकाराम महाराज बिजनिमित्त शहरातील समस्त कुणबी पाटील समाजाच्या वतीने पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, लहान माळी वाडा परीसरातील समस्त कुणबी पाटील समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अखंड हरिनाम किर्तन सप्ताह साजरा झाला. सप्ताहाची समाप्ती झाल्यानंतर सायंकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालखीत विठू माऊली – आई रखुमाई यांच्या मूर्ती तसेच जगद्गुरू तुकाराम महाराज यांची प्रतिमा होती. पालखीच्या समोर गावातील व परिसरातील असंख्य युवक तसेच भाविकांनी सवाद्य लेझीम पथकातून सहभाग नोंदवला. लेझीम च्या माध्यमातून विविध प्रकारचे लेझीम प्रकार शिस्तबद्ध रीतीने खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये युवकांचा उत्साह, शिस्त, आनंद अवर्णनीय होता.

यासोबतच महिला भगिनींची देखील लक्षणीय उपस्थिती पहायला मिळाली. महिला व युवतींनी फुगड्या खेळून तसेच ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली. जेष्ठ मंडळी, पंच मंडळातील सदस्य, युवक तसेच परिसरातील सर्व समाज बांधवांनी हातात टाळ घेऊन भक्तिमय वातावरण निर्माण केले. “ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम – तुकाराम – तुकाराम – तुकाराम” अशा नामस्मरणाने परिसरात मांगल्य व चैतन्य निर्माण झाले. लहान माळी वाडा परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. तद्नंतर सिद्धि हनुमान मंदिरात पालखी मिरवणुकीचा समारोप झाला. परतीच्या प्रवासात समस्त पाटील समाज मढी मध्ये येऊन पांडुरंग – ज्ञानोबा – तुकोबांच्या आरतीने तसेच जयघोषाने परिसर दणाणून निघाला. पालखी सोहळ्यात लहान माळी वाडा परिसरातील समाज बांधव, महिला भगिनी, युवक – युवती तसेच बालगोपालांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन समस्त पाटील समाज पंच मंडळ धरणगाव यांच्या वतीने करण्यात आले होते.

Previous Post

जळगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Next Post

सांगवी बुद्रुक येथील विवाहिता तीन दिवसांपासून बेपत्ता

Next Post

सांगवी बुद्रुक येथील विवाहिता तीन दिवसांपासून बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group