पाचोरा : प्रतिनिधी
येथील तरुणाच्या खून प्रकरणात वापरण्यात आलेला चाकू पूरविणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे. तिसरा एक जण अल्पवयीन आहे. त्यास बालसुधार गृहात रवाना करण्यात आले आहे.
मंगळवारी मध्यरात्री हेमंत संजय सोनवणे (२०, रा. बाहेरपुरा, पाचोरा) या युवकाचा रोहित गजानन लोणारी (२१, रा. शिवकॉलनी, पाचोरा) याने चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणात रोहित यास चाकू पुरविणारा एक अल्पवयीन आहे. त्यास ताब्यात घेऊन बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. तर चाकू लपविणारा पृथ्वीराज राजू भोई (२०, रा. बाहेरपुरा, पाचोरा) यास पोलिसांनी अटक केली आहे. रोहित यास तीन दिवसाची तर भोई यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेत वापरलेले चाकू पोलिसांनी हस्तगत केला आहे.