वरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील बोहर्डी गावा जवळील राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी १८ रोजी रात्री ८. ३० वाजता लोंखडी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे. नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रालाचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरून नागपूर कडून भुसावळकडे येणारा ट्रक क्र सी जे १५ वाय वाय ९८१९ लोखंडी साहित्य घेऊन गुजरातकडे जात होता. दरम्यान तालुक्यातील बोहर्डी गावा जवळील नागराणी पेट्रोल पंपासमोर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. ट्रक चालक मेराजुल अन्सारी रेहमान अन्सारी रा. गोखुला मिसवा मोलहारी (बिहार) हा जागीच ठार झाल्याची घटना घडली.
ट्रक उलथल्यामुळे त्यातील लोखंडी रॉड, पाईप रस्तावर पडल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी टप्प झाली होती मात्र घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीसानी घटना स्थळी धाव घेत ट्रक व लोखंडी साहीत्य बाजुला सावरत वाहतूक सुरळीत केली. या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास पो कॉ प्रेमचंद सपकाळे हे करीत आहे