• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घरात उत्साहाचे वातावरण राहणार !

आजचे राशिभविष्य दि.२० फेब्रुवारी २०२५

editor desk by editor desk
February 20, 2025
in राशीभविष्य
0
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

मेष राशी

श्रीगणेश सांगतात की, आज कुटुंब आणि नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवला जाईल. मित्रांसोबत भेटीगाठी फायदेशीर ठरतील. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत संवाद साधताना काळजी घ्‍या. लहानशा निष्काळजीपणामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. व्यावसायिक कामे सुरळीत सुरु राहतील.

वृषभ राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज संवाद कौशल्‍याने इतरांवर प्रभाव टिकवून ठेवाल. लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतील. घरात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे आगमन देखील एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करू शकते. तुमच्या गुणांचा सकारात्मक पद्धतीने वापर केला तर चांगले परिणाम मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा.

मिथुन राशी

श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही पैशाशी संबंधित काही नवीन धोरणे राबविण्‍यात यशस्वी व्हाल. कौटुंबिक सुखसोयींवरही खर्च होईल. घरात एखाद्याच्या आरोग्याबद्दल थोडी चिंता असेल. व्यवसायात अंतर्गत सुधारणा किंवा स्थान बदलण्याची आवश्यकता आहे.

कर्क राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये वेळ व्‍यतित कराल. खर्चाबरोबर उत्‍पन्‍नाचा स्रोत देखील असेल, त्यामुळे आर्थिक तणाव जाणवणार नाही. कौटुंबिक आणि सामाजिक उपक्रमात वेळ व्‍यतित करा. व्यवहारात लवचिकता राखणे अत्यंत महत्वाचे आहे. प्रभावशाली व्यक्तीचे योगदान तुम्हाला व्यवसायाशी संबंधित काही नवीन यश मिळवून देऊ शकते.

सिंह राशी

श्रीगणेश सांगतात की, अचानक एखाद्या अनोळखी व्यक्तीची भेट फायदेशीर ठरेल. मालमत्ता विक्रीचा विचार असेल तर त्‍यावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबातील ज्‍येष्‍ठ व्यक्तीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. न्‍यायालयीन प्रकरणात योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या, मार्केटिंग आणि मीडियाशी संबंधित सर्व कामे योग्यरित्या पूर्ण होतील. पती-पत्नीमधील नात्यात गोडवा वाढेल. आरोग्‍याच्‍या समस्‍या जाणवतील.

कन्या राशी

आज तुम्‍ही तुमच्या कार्याप्रती समर्पित असाल. ग्रहमान अनकूल आहे; पण मनात नकारात्मक विचार येणण्याची शक्‍यता. सकारात्‍मक विचारसणीच्‍या लोकांवर वेळ व्‍यतित करा. आत्मनिरीक्षणात थोडा वेळ घालवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यावसायिक कामांकडे तुमचे पूर्ण लक्ष द्या. आरोग्य उत्तम राहील.

तुळ राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज बहुतांश वेळ सामाजिक आणि राजकीय कामांत व्‍यतित होईल. मुलाच्या करिअरशी संबंधित कोणत्याही समस्या एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या मदतीने सोडवल्यास यश मिळू शकते. घरातील वडीलधाऱ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद तुमच्यासाठी वरदान ठरतील. घरातील वातावरणात शिस्त राखणे आवश्यक आहे.

वृश्चिक राशी

श्रीगणेश सांगतात की, तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही बदल करण्याचे नियोजन करायला सुरुवात कराल. तुमची कार्यक्षमता वाढवू शकाल. धर्म आणि कर्माशी संबंधित बाबींमध्येही तुम्ही योगदान द्याल. वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेबाबत कोणताही वाद वाढू शकतो. पैशाशी संबंधित कामे करताना काळजीपूर्वक विचार करा. रागवर नियंत्रण ठेवा. सध्या कामाच्या क्षेत्रातील कामे पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.

धनु राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही बहुतेक काम स्वतः नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कधीकधी तुमच्या कामात व्यत्यय आल्याने काही वेळ वाया जाईल. सध्या केवळ व्‍यक्‍तिगत कामांवर लक्ष केंद्रीत करा. कोणत्याही प्रकारची व्यावसायिक कामे मार्गी लागतील.

मकर राशी

श्रीगणेश सांगतात की, धार्मिक संस्थांमधील कार्यात सहभागी व्‍हाल. मालमत्तेच्या खरेदी किंवा विक्रीशी संबंधित योजना असतील. कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे करताना अधिक काळजी घ्या. एक छोटीशी चूक तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण करू शकते. पैशाशी संबंधित बाबी सध्या थोड्या मंदावू शकतात. व्‍यवसायातील स्‍थिती सामान्य राहील. पती-पत्नीचे संबंध मधूर होतील.

कुंभ राशी

श्रीगणेश म्हणतात की, आज सर्व काम योग्यरित्या पूर्ण झाल्‍याने आंतरिक शांतता लाभेल. नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी संबंधांमध्ये अधिक सुधारणा होईल. उत्पन्नाच्या साधनांमध्ये थोडीशी घट होऊ शकते. व्यवसायातील घडामोडींकडे दुर्लक्ष करु नका.

मीन राशी

श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही प्रत्येक काम व्यावहारिक पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मित्र आणि नातेवाईकही तुमच्या बुद्धिमत्तेचा आदर करतील. घरात उत्सवाचे वातावरण असेल. संततीकडून समाधानकारक निकाल मिळेल. तुमचा व्यावहारिक दृष्टिकोन कार्यक्षेत्रातील अनेक बाबी सोडवण्यास सक्षम असेल. पती-पत्नीमध्ये काही वाद होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील.

 

Previous Post

मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट : मराठा आरक्षणाची मागणी दडपण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल !

Next Post

पूर्ववैमनस्यातून वाद : पाचोऱ्यात २० वर्षीय तरुणाचा खून !

Next Post
पूर्ववैमनस्यातून वाद : पाचोऱ्यात २० वर्षीय तरुणाचा खून !

पूर्ववैमनस्यातून वाद : पाचोऱ्यात २० वर्षीय तरुणाचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !
राजकारण

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !

July 2, 2025
पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group