धाराशिव : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षापासून मनोज जरांगे पाटील अनेक उपोषण व आंदोलन करीत असतांना आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यांनी आरक्षणाचा मुद्दा लावून धरला असून या विषयी ते सातत्याने आपली भूमिका मांडत आहेत. यातच जरांगे पाटील हे शिवजयंती निमित्ताने धाराशिव आले होते.
या कार्यक्रमात त्यांनी मोठा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. मराठा आरक्षणाची मागणी दडपण्यासाठी सरकारनं दोन मंत्र्यांच्या सोबतीनं नवं आंदोलन उभारण्याचा डाव रचल्याचा खळबळजनक दावा यावेळी बोलताना त्यांनी केला आहे. तसेच हे आंदोलन उभे करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या दोन मंत्र्यांच्या चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
आता जे गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समोर मराठा आरक्षणावरून सरकार नवं आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. म्ही म्हणू तसे ऐका, अन्यथा षडयंत्र रचून बदनाम करू अशी सरकाची भूमिका असल्याचे ते म्हणाले.
या प्रति आंदोलनात दोन मंत्री असून १२ ते १३ दिवस हे आमरण उपोषण करणार आहेत. या सगळ्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीसांची साथ असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. हे त्यातल्या एका मंत्र्यानी मला सांगितलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
२२ फेब्रुवारी ते २२ मार्च या कालावधीत आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. प्रत्येक गावात एक सेवक द्यावा लागणार आहे. त्याला संपूर्ण गाव अडचणी सांगेल असे जरांगे पाटील म्हणाले. आज धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जरांगे पाटील यांनी हजेरी लावणार आहेत.