Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिला पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणाऱ्याला नागरीकांकडून चोप
    क्राईम

    महिला पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणाऱ्याला नागरीकांकडून चोप

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMarch 18, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । । शहरातील नेरी नाका येथे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की करून विनयभंग व धमकी देणाऱ्या व्यक्तीला गर्दीतील नागरीकांकडून चोप दिल्याचा घटना घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी ह्या गुरूवार १७ मार्च रोजी शहरातील नेरी नाका येथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी ड्युटीवर होत्या. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सलीमखान आरमानखान पठाण (वय-५१) रा. पाळधी मोहल्ला ता. धरणगाव हा महिला पोलीस कर्मचारी यांच्याकडे आला. व मनीषा मॅडमचा मोबाईल नंबर द्या असे सांगितले. आपल्याकडे मनीषा मॅडमचा मोबाईल नंबर नसल्याचे महिलेने सांगितले. याचा राग आल्याने सलीमखान हा महिला पोलीसाच्या अंगावर धावून आला. आणि ‘मी रिपोर्टर आहे, मी तुझी नोकरी घालवतो, तुझा साहेब मला सलाम करीन’ अशी धमकी दिली. कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारीचा हात पकडून तसेच तिचा मोबाइलमध्ये फोटो काढल्यावरुन गोंधळ निर्माण झाला. याबाबत महिला पोलिस कर्मचारी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फोनकरून पोलीस कर्मचाऱ्यांना यांना बोलावून घेतले. यावेळी शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोहेकॉ सविता परदेशी, पो.कॉ.किरण मराठे, पोकॉ. रतिलाल पावरा, पो.कॉ. राहुल पाटील यांनी धाव घेतली. त्यावेळी त्या इसमाला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यापूर्वी या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही नागरीकांकडून त्याला चांगला चोप देण्यात आला. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात संशयित आरोपी सलीम खान आरमानखान पठाण (वय-५१) राहणार मोहल्ला तालुका धरणगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शनिपेठ पोलिस कर्मचारी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.