लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील बाभुळगाव शिवारात मध्यरात्री बिबट्याने गोहऱ्यावर हल्ला करून फडशा पडला आहे. हा प्रकार सकाळी उघडकीला आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर धनगर पाटील याचे बाभुळगाव शिवारात शेत असून त्यांनी शेतात काल सोमवारी १५ मार्च रोजी गुरे बांधली होती. दरम्यान मध्यरात्री बिबट्याने गुरावर हल्ला करून फडशा पाडला आहे. एक महिन्या पूर्वी देखील परिसरातील काही शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. आज सकाळी गुराचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांनी तलाठी आशिफ शेख आणि एरंडोल वनविभागाचे अधिकारी राजकुमार ठाकरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसराती शेतकऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.