मेष राशी
श्रीगणेश सांगतात की, आज समर्पित वृत्तीने काम केल्यास तुमच्या उत्पन्नात वृद्धी होईल. आर्थिक व्यवहार सुधारतील. कोणतीही योजना आखण्यात घाई करू नका.नकारात्मकता वर्चस्व गाजवू शकते. भावनेच्या भरात घेतलेली निर्णय तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. नवीन काम सुरू करण्यास वेळ चांगला आहे. जोडीदाराचा सल्ला तुमचे आत्मबल टिकवून ठेवेल.
वृषभ राशी
श्रीगणेश म्हणतात की, तुमचे पूर्ण लक्ष आर्थिक बाबींवर सक्षम करण्यावर असेल. घराच्या नुतनीकरणाच्या विचारात असाल तर वास्तुचे नियमांचे पालन करणे हितकारक ठरेल. पैसे उधार देताना काळजी घ्या. कार्यक्षेत्रावर लक्ष केंद्रित करा.जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील.
मिथुन राशी
आज तुमच्या सुप्त प्रतिभेला चालना मिळेल. विश्रांतीलाही प्राधान्य द्याल. नकारात्मक विचारांमुळे केवळ नुकसान होते, याची जाणीव ठेवा. नातेवाईकांसोबतचे संबंध बिघडणार नाहीत, याची काळजी घ्या. भागीदारीशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
कर्क राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्हाला आत्मविश्वास आणि उर्जेने परिपूर्ण वाटेल. चुकीच्या कृतींमध्ये खर्च वाढेल. एखाद्या मित्राला पैशाची मदत करावी लागू शकते. मुलांबद्दल मनात एखाद्या गोष्टीची चिंता असेल. कार्यक्षेत्रात जबाबदारीत वाढ होईल. रागावर नियंत्रण ठेवा.
सिंह राशी
श्रीगणेश सांगतात की, स्वामी सूर्यदेव तुम्हाला पूर्ण ऊर्जा आणि आत्मविश्वास देत आहे. ग्रहांची स्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. मात्र अहंकार आणि अतिआत्मविश्वासाने नुकसान होवू शकते, याची जाणीव ठेवा. आज भागीदारीचा विचार करु नका. जोडीदारासोबत काही तणाव असू शकतो. सांधेदुखीचा त्रास संभवतो
कन्या राशी
आज नवीन लोकांशी संपर्क फायदेशीर ठरेल. धार्मिक नियोजनासाठी तुम्हाला जवळच्या नातेवाईकाच्या घरी जाण्याची संधी मिळेल. मैत्रीत भावनिक होवून कोणताही निर्णय घेवू नका. मुलावर अति नियंत्रण ठेवू नका, असा सल्ला श्रीगणेश देतात. कौटुंबिक व्यवसायात प्रगती होऊ शकते. कौटुंबिक सुव्यवस्था राखण्यासाठी जोडीदाराला पूर्ण पाठिंबा मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ राशी
श्रीगणेश सांगतात की, कठोर परिश्रमाने ध्येयपूर्ती कराल. तुमचे पूर्ण लक्ष आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर देखील असेल. कोणत्याही बेकायदेशीर कामात सहभागी होवू नका. तुमची कामे संयमाने पूर्ण करत रहा. जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला अनेक कामांमध्ये मदत करेल. वाहन काळजीपूर्वक चालवा.
वृश्चिक राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज योग्य नियोजनाने कोणतेही काम पूर्ण करू शकाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. भूतकाळातील चुका टाळा. घरातील वडीलधाऱ्यांचे सहकार्य तुमच्या अनेक समस्यांवर उपाय सापडेल. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील.
धनु राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज योग्य नियोजनाने कोणतेही काम पूर्ण करू शकाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. भूतकाळातील चुका टाळा. घरातील वडीलधाऱ्यांचे सहकार्य तुमच्या अनेक समस्यांवर उपाय सापडेल. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील.
मकर राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज प्रत्येक काम करण्यापूर्वी नियोजनबद्ध पद्धतीने विचार करणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. कधीकधी अतिविचारामुळे महत्त्वाच्या कामात अडचण निर्माण होईल. घरातील समस्यांबद्दल पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो.
कुंभ राशी
श्रीगणेश सांगतात की, आज आवडीच्या कामात वेळ व्यतित कराल. मात्र कुटुंबातील गरजांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. तुमच्या निष्काळजीपणामुळे मुलांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होणार नाहीत, याची काळजी घ्या. कार्य व्यस्ततेमुळे पती-पत्नी एकमेकांना वेळ देऊ शकणार नाहीत. आरोग्याची काळजी घ्या.
मीन राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज नशीबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवल्याने तुम्हाला यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे. मातृपक्षाशी तुमचे संबंध बिघडू शकतात. सार्वजनिक व्यवहार आणि शिक्षणाशी संबंधित व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता असेल. पित्ताशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.