जळगाव : प्रतिनिधी
दोन दुचाकींची धडक होऊन ठाकूरदास छुगोमल प्यारप्याणी (५१, रा. सिंधी कॉलनी) हे जखमी झाले. ही घटना ९ फेब्रुवारी रोजी पंचमुखी हनुमान मंदिराजवळ घडली. याप्रकरणी १३ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूरदास प्यारप्यानी हे मोहित सत्यपाल प्यारप्यानी (२३) याच्यासोबत दुचाकीने (क्र. एमएच १९ ईजे ९९३४) जात होते. त्यावेळी ही दुचाकी समोरील दुचाकीवर धडकली. यात ठाकूरदास प्यारप्यानी हे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी त्यांनी १३ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.