Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरदुपारच्या सुमारास प्रेमप्रकरणातून महिलेवर कोयत्याने हल्ला
    क्राईम

    भरदुपारच्या सुमारास प्रेमप्रकरणातून महिलेवर कोयत्याने हल्ला

    editor deskBy editor deskFebruary 14, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कराड : वृत्तसंस्था

    तालुक्यातील आगाशिवनगर येथील दांगट वस्तीत प्रेमसंबधातून एका ३० वर्षीय महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवार (दि. १३) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जास्त रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविंद्र सुभाष पवार (वय ३५) रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर (मलकापूर) असे हल्लेखोराचे नाव आहे. हल्ला केल्यानंतर त्याने पलायन केले असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना केली आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, संबधित महिला विवाहित असून नवऱ्याला सोडून ती दांगट वस्ती येथे आई-वडिलांकडे राहण्यास आहे. तिला तीन मुले आहेत. रविंद्र याच्याशी तिचा पूर्वीचा परिचय असून, तिचे त्याच्याशी प्रेमसंबधही होते. गुरुवारी दुपारी रविंद्र तिच्या घरी गेला होता. त्यांच्यात काहीतरी बोलणे झाले. त्यानंतर रविंद्रने तिच्यावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या कानापासून जबड्यापर्यंत वार गेल्याने तिचा जबडा पूर्ण फाटून ती गंभीर जखमी झाली आहे.

    कृष्णा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर रविंद्रने घटनास्थळावरून पलायन केले असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत. याप्रकरणी गंभीर जखमी झालेल्या महिलेच्या वडिलांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरिक्षक राजू ताशिलदार यांनी भेट देवून पाहणी करून घटनास्थळचा पंचनामा केला. याप्रकरणी कराड शहर पोलीस तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आयटी क्षेत्रातील तरुणीचा गंभीर आरोप; फसवणूक, अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरणी तपासाची मागणी !

    April 12, 2026

    वेगवेगळ्या राज्यांचे पत्ते, पेमेंट रोखून फसवणूक; ‘रेझॉरपे’ व्यवहारातून प्रकार उघड

    April 12, 2026

    डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त जळगाव शहरात वाहतूक बदल !

    April 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.