• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अट्रावल शिवारातील शेतात २ हजार केळीचे घड कापून नुकसान; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
March 15, 2022
in क्राईम, यावल
0
अट्रावल शिवारातील शेतात २ हजार केळीचे घड कापून नुकसान; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून अट्रावल रोडवरील शेतकऱ्याच्या शेतातील २ हजार केळीच्या घड कापून सुमारे ६ लाख रूपयांचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना सोमवारी १४ मार्च रोजी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल शिवारातील अट्रावल रस्त्यावर असलेल्या डॉ. दिनकर वारके यांच्या मालकीच्या शेतात किशोर देवराम राणे यांनी निम्मे हिस्स्याने शेत केले आहे. या शेतात त्यांनी केळीच्या झाडांची लागवड केली आहे. सोमवार १४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या शेतातील केळीच्या २ हजार झाडावरील घड कापून सुमारे सहा लाख रूपयांचे नुकसान केल्याची घटना समोर आले आहे. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी शेतकरी किशोर राणे यांच्या हरभऱ्याच्या शेतात बकऱ्या चारण्यावरून वाद झाला होता. यात राणे यांना बकऱ्या चारणारे राजेंद्र काशिनाथ जाधव, विनोद गोविंदा खैरे, स्वप्निल उर्फ भुरा छगन धनगर, धनराज उर्फ बबलू राजू धनगर, एकनाथ तोताराम भिल, अनिल गंगाराम धनगर सर्व रा. यावल यांनी मारहाण करून शेत कशी करतो अशी धमकी दिली होती. त्यानुसार याच सहा जणांनी शेतातील पिकांचे नुकसान केल्याची तक्रार किशोर राणे यांनी यावल पोलीस ठाण्यात सायंकाळी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहे.

Previous Post

जळगाव पं.स. कार्यालयासमोर नंदगावच्या ग्रामस्थांने ठिय्या आंदोलन

Next Post

येवती येथे विद्यार्थिनींनी दिला रोडरोमिओला चोप !

Next Post
येवती येथे विद्यार्थिनींनी दिला रोडरोमिओला चोप !

येवती येथे विद्यार्थिनींनी दिला रोडरोमिओला चोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

पहूर येथे चारचाकीने मायलेकीना दिली धडक : अखेर गुन्हा दाखल !

June 26, 2025
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
क्राईम

खळबळजनक :  अनोळखी महिलेचा खून करून मृतदेह गोणीत भरून फेकला !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group