• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भावाने मारला बहिणीच्या घरात डल्ला : पोलिसांनी केली अटक

editor desk by editor desk
February 14, 2025
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ
0
भावाने मारला बहिणीच्या घरात डल्ला : पोलिसांनी केली अटक

भुसावळ : प्रतिनिधी

येथील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील पाटील मळा भागातील फळ विक्रेत्याकडे चोरट्याने भर दिवसा घरफोडी करुन २८ हजारांच्या रोकडसह १ लाख ४४ हजारांचे दागिने लांबवले होते. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तपास लावून फिर्यादीच्या पत्नीच्या चुलत भावालाच या गुन्ह्यात अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, भुसावळात चोरी झाल्याचा हा प्रकार सोमवारी दुपारी दोन ते अडीच वाजेदरम्यान समोर आला होता. तर भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीमुळे नागरिक धास्तावले होते. बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासात घरफोडीची उकल करत संशयित रिजवान फकीरा बागवान (३८, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) यास अटक केली. संशयित आरोपीकडून १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, मुंजोबा मंदिराजवळील पाटीलवाडा भागात राहणाऱ्या इब्राहिम इलियास बागवान यांच्या नातेवाईकांचे लग्न असल्याने ते कुटुंबातील सदस्यांसह गावातच सोमवारी दुपारी लग्नाला गेले होते. ही संधी साधून संशयित रिजवान बागवानने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटातून सोन्या-चंदीचे दागिने आणि २८ हजार रुपयांची रोकड असा १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबवला होता. तक्रारदाराच्या पत्नीचा संशयित आरोपी हा दूरच्या नात्याने भाऊ असून त्याचे बागवान यांच्याकडे येणे-जाणे होते. पोलिसांच्या तपासात व सीसीटीव्हीतही ही बाब स्पष्ट होताच संशय बळावला व आरोपीला पकडताच त्याने गुन्ह्याची कबुली देत मुद्देमाल काढून दिला.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठचे पो.नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, एएसआय हसमत अली सय्यद, हवालदार विजय बळीराम नेरकर, हवालदार रमण काशीनाथ गुरळकर, हवालदार महेश एकनाथ चौधरी, कॉन्स्टेबल जावेद हकीम शाह, कॉन्स्टेबल राहुल विनायक वानखेडे, कॉन्स्टेबल अमर सुरेश अदाळे, कॉन्स्टेबल प्रशांत रमेश परदेशी आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करत आहेत.

Previous Post

दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने लांबवले अडीच लाखांची रोकड !

Next Post

एकनाथ शिंदेंनी दिला कॉंग्रेसला धक्का ; माजी आमदार देणार साथ !

Next Post
एकनाथ शिंदेंनी दिला कॉंग्रेसला धक्का ; माजी आमदार देणार साथ !

एकनाथ शिंदेंनी दिला कॉंग्रेसला धक्का ; माजी आमदार देणार साथ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group