• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

व्हायरल झालेल्या फोटो बाबत कृष्णराज महाडिकांनी सोडले अखेर मौन !

editor desk by editor desk
February 13, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
व्हायरल झालेल्या फोटो बाबत कृष्णराज महाडिकांनी सोडले अखेर मौन !

कोल्हापूर : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून भाजपा नेते धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक आणि सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. कृष्णराज महाडिक हे रिंकूसोबत लग्न करणार आहेत, अशी देखील चर्चा सुरू झाली. अखेर या फोटोवर प्रतिक्रिया देताना कृष्णराज महाडिक यांनी मोठा खुलासा केला आहे, त्यानंतर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी कृष्णराज महाडिक यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोमध्ये ते रिंकू राजगुरूसोबत दिसत आहेत.’आज अभिनेत्री रिंकू राजगुरू या कोल्हापूरमध्ये आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले असं कॅप्शन हा फोटो पोस्ट करताना देण्यात आलं होतं. त्यानंतर अवघ्या काही वेळेतच हा फोटो व्हायरल झाला आणि कृष्णराज महाडिक हे रिंकूसोबत लग्न करणार आहेत, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर अखेर कृष्णराज महाडिक यांनी या फोटोबाबत खुलासा केला आहे. त्यानंतर आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

संपूर्ण माहिती खोलात जावू देतो. आर्ची कार्यक्रमासाठी आली होती. आर्ची आणि माझ्या फोटोमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आर्ची माझी फक्त चांगली मैत्रीण आहे.कदाचित साहेबांच्या वक्तव्यावरून गोंधळ झाला. लग्नाच्याबाबतीत मी काहीही सांगू शकत नाही.माझा चाहता वर्ग खूप मोठा आहे, माझ्या चाहत्यांना सांगतो सर्वांनी संयम ठेवा, आमची ठरवून भेट झालेली होती. आम्ही एकत्र दर्शन घेतलं. मात्र तसं काही नाही. तिच्यासोबत माझी चांगली ओळख आहे, ती माझी फक्त एक चांगली मौत्रीण आहे. लग्नाबाबत काय होणार लवकरचं कळेल, थोडा संयम ठेवा सगळं कळेल अशी प्रतिक्रिया या फोटोवर कृष्णराज महाडिक यांनी दिली आहे. दरम्यान कृष्णराज महाडिक यांच्या या खुलाशानंतर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आर्ची आपली फक्त एक मैत्रिण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Previous Post

कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ ? पटोलेंचा राजीनामा !

Next Post

या राशीतील लोकांचे आर्थिक प्रश्‍न सुटतील !

Next Post
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !

या राशीतील लोकांचे आर्थिक प्रश्‍न सुटतील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group