Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव पं.स. कार्यालयासमोर नंदगावच्या ग्रामस्थांने ठिय्या आंदोलन
    जळगाव

    जळगाव पं.स. कार्यालयासमोर नंदगावच्या ग्रामस्थांने ठिय्या आंदोलन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMarch 14, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नंदगाव-फेसर्डी ग्रुप ग्रामपंचायतीला सहा महिने उलटल्यानंतरही ग्रामसेवक मिळत नसल्याने सरपंचासह ग्रामस्थांकडून सोमवारी १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जळगाव पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले आहे.

    याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नंदगाव-फेसर्डी ग्रुप ग्रामपंचायतीला सहा महिने उलटल्यानंतरही ग्रामसेवक मिळालेला नाही. त्यामुळे विविध विकास कामांसह जन्म दाखला, मृत्यू दाखला, उतारे व विविध घरकुल योजनांची कामे रखडली आहेत. ग्रामसेवक मिळावा यासाठी पंचायत समिती कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, ग्राम विस्तार अधिकारी हे ग्रामसेवक नियुक्त केला आहे, असे सांगून वेळ मारून नेत आहेत. गेल्या ४ वर्षांपासून ग्रामपंचायतीचे दप्तर ऑडिटच्या नावाखाली जप्त करण्यात आले आहे. नांदगाव-फेसर्डी ग्रुप ग्रामपंचायतीला जाणीवपूर्वक विकास कामांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप सरपंच भूषण पवार यांनी यावेळी केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव बोलेरोने उडवली जीवांची राख; तिहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

    March 15, 2026

    नात्याला कालिमा : ३१ वर्षीय महिलेला गुंगीकारक पेय देवून अत्याचार !

    March 15, 2026

    वडिलांना मारहाण केल्याचा राग; वाल्मिक नगरात तिघांवर दोन राऊंड फायर, संशयित अटकेत !

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.