जळगाव : प्रतिनिधी
मित्राची बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था पाहण्यासाठी जळगावला येत असताना वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे मोहित संजय मोरे (२०, रा. उमाळा ता. जळगाव) हा तरुण ठार झाला. तर इयत्ता बारावीचा विद्यार्थी गौरव अशोक पाटील (१८, रा.उमाळा) जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुपारी १ वाजेच्या सुमारास आर.एल. चौफुलीपासून पुढे आल्यानंतर मागून येणाऱ्या एका वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोहितचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मोहीत हा फार्मसीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.