जळगाव – प्रतिनिधी । तालुक्यातील कडगाव शिवारात पोकलँडमधुन डिझेल चोरी करताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना गुरुवार १० मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कडगाव शिवारात लिफ्ट एरीगेशन स्कीमच्या पंप हाऊसचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी पोकलंडचा वापर करण्यात येत असून या पोकलँड वर मोहम्मद हसनैन नुरमोहम्मद हा चालक म्हणून कामाला आहे. गुरुवारी १० मार्च रोजी सकाळी मोहम्मद हा पोकलेनच्या टाकीमधून २६ लिटर २ हजार ४७० रुपये किमतीचे डिझेल चोरी करताना मिळून आला. याप्रकरणी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरील सिव्हिल इंजिनिअर विवेक मधुकर बेदरकर (वय ४२) याच्या फिर्यादीवरुन चालक मोहम्मद हसनैन नुरमोहम्मद रा. ताजपूर सारण थाना जनता बाजार जि. छपरा, बिहार, ह.मु. कडगाव ता. जि.जळगाव याच्याविरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक फौजदार अलियार खान हे करीत आहेत.