Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दापोरा शिवारात दोन गावठी दारू हातभट्टी उध्दवस्त; तालुका पोलीसांची कारवाई
    क्राईम

    दापोरा शिवारात दोन गावठी दारू हातभट्टी उध्दवस्त; तालुका पोलीसांची कारवाई

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रMarch 11, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील दापोरा शिवारात गावठी हातभट्टीवर तालुका पोलीसांनी धडक कारवाई करत हातभट्टी उध्दवस्त केली आहे. याप्रकरणी दोन जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील दापोरा शिवारातील शेतात बेकायदेशीर गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवार ११ मार्च रोजी दुपारी तालुका पाोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी दापोरा शिवारात सुरू असलेल्या दोन गावठी हातभट्टीवर धाडी टाकल्या. याठिकाणी कच्चे व पक्के रसायन असे एकुण १ लाख २६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाला आढळून आला. यातील दारू बनविण्याचे कच्चे व पक्के रसायन पोलीसांनी नष्ट केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अरूण सोनवणे आणि जीभाऊ वसंत गायकवाड दोन्ही रा. दापोरा ता.जि.जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई  पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश सायकर, पोहेकॉ हरीलाल पाटील, विश्वनाथ गायकवाड, अनिल मोरे, नाना मोरे, संजय भालेराव, अभिषेक पाटील, उमेश ठाकुर यांनी केली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.