मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मैदानात महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलीच लढत रंगली होती तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्यानंतर ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात दाखल होत असतांना आता पुन्हा एकदा भाजपने ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का दिला आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत इंडिगोचे कर्मचारी आज भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबई व गोवा विमानतळावरील २ हजार कर्मचारी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेच्या संघटनेला चांगलाच धक्का बसला आहे.
युनियन क्षेत्रात याआधी आम्ही काम केलं नाही, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करतो . पण सोल्युशन फक्त आमच्याकडेच आहे याची ग्वाही देतो असे रवींद्र चव्हाण म्हणाले. युनियन क्षेत्र आणि प्रत्येकाला सांगण्याचे काम करत असतो की इंडस्ट्री जिवंत राहिली तर आपण जिवंत राहू. त्यामुळे ऊस मुळासकट न खाता, गोडवा चांगला राहावा यासाठी प्रयत्न करू. अन्याय होणार नाही से मी तुम्हाला खात्रीने सांगतो, असे आश्वासनही चव्हाण यांनी दिलं.
तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करत होता, त्यात बदल कसे घडवून आणले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू. मुंबई, गोवा यासर्व ठिकाणावरील कर्मचाऱ्यांनी प्रवेश केला. इथे अनेक भांडूपवासी आहेत, मी देखील तेथे काही काळ होतो, त्यामुळे सर्वांना काही गोष्टी आधीच कळतात. मुंबई विमानतळाचे इंडिगो किंवा कर्मचारी काम करतात त्यांना १०० टक्के वाटायला लागलं की मोदी आणि फडणवीस जी यांच्या नेतृत्वात पुढे जात आहे, 12 बलुतेदारांना पुढे नेण्याचे काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात होत आहे. ही सुरुवात आहे, इंडिगोचे मुंबई किंवा गोवाचे जवळपास पावणे तीन हजार कर्मचाऱ्यांनी प्रवेश केला आहे, यचा आनंद आहे. विमानतळाबाहेर पराग अळवणी आणि त्यांची टीम काम तिकडे करते आहे . तर आता विमानतळाच्या आत देखील भाजप आहे, असे चव्हाण म्हणाले. आम्ही कोणाची मक्तेदारी तोडली असं म्हणणार नाही. पण कामगारांचे हित हवं आहे, ते काम आम्ही करतोय. असंघटित कामगार म्हणून काम करत आहेत, भाजपनं यात मोठं काम केलं आहे, आरोग्य सुविधा कशा देता येतील, कुटुंब येत्या काळात पुढे कसं जाईल यावर काम करू असेही चव्हाण म्हणाले.