एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील कढोली येथील व्यापारी गणेश बंडू बडगुजर (६२) सोमवारी सायंकाळी यांनी साडेसात वाजेच्या सुमारास काशिनाथ पलोड शाळेजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
सविस्तर वृत्त असे कि, व्यापारी गणेश बडगुजर गावासह परिसरातील शेतकऱ्यांकडून गहू, मका, ज्वारी, सोयाबीन, कपाशी, तूर अशी धान्य घेऊन ते धुळे येथील व्यापाऱ्याला देत होते. त्यांच्यावर लाखोचे कर्ज होते. कर्ज कसे फेडायचे या विंवचनेत गेल्या काही दिवसापासून जगत होते. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.