Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन दिवसांवर मार्ग काढा, तुम्हाला हात जोडतो. अन्यथा… मनोज जरांगे पाटील आक्रमक !
    राजकारण

    दोन दिवसांवर मार्ग काढा, तुम्हाला हात जोडतो. अन्यथा… मनोज जरांगे पाटील आक्रमक !

    editor deskBy editor deskFebruary 3, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात मराठा आरक्षणसाठी तीन तरुणांनी आत्महत्या केली होती. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना आत्महत्या न करण्याची विनंती केली. न मिळणारे आरक्षण आपल्याला मिळत आहे. मला राज्यात कुणाची नाही, पण तुमची फार गरज आहे. मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही आत्महत्या करू नका, असे मनोज जरांगे म्हणाले. एका टक्क्यावरून हुकले, तर हुकू द्या. धाडसी बना. एक दोन वर्ष रिपीट करा, पण आपल्या आई-बापापासून लांब जाऊ नका. आपल्या आई-बापाला दुसरा कोणाचा आधार नाही, असेही ते म्हणाले.

    मनोज जरांगे यांनी सरकारकडेही दोन दिवसांत मार्ग काढण्याची मागणी केली. मराठा आरक्षणावर दोन दिवसांवर मार्ग काढा, तुम्हाला हात जोडतो. अन्यथा आम्हाला आंदोलन अधिक तीव्र करावे लागले, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड, बदनापूर आणि सिल्लोड येथे मराठा समाजबांधवांनी आत्महत्या केली होती. यावरून मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना आत्महत्या न करण्याची विनंती केली.

    मनोज जरांगे म्हणाले, यावेळेस आरक्षण हुकले, हा तुमचा दोष नाही. तुमचे आई-वडील तुम्हाला कष्ट करून पैसे पुरवतात. नोकरी लागण्याचे तुम्ही स्वप्न बघितलेले असते. दुसरा कमी गुण असून नोकरीला लागला. पण तुम्हाला मार्क असून तुम्ही लागला नाहीत. तुमची भावना योग्य आहे. पण नाईलाज आहे. एक-दोन वर्ष उशिर होऊ द्या. काही फरक पडत नाहीत. तुम्ही कायमचे संपू नका.

    मनोज जरांगे यांनी पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. तुम्हाला अजून किती बळी पाहिजेत? असा सवाल जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. वेगळ्या कारणासाठी दोन-चार जणांनी आत्महत्या केली, तर तुम्ही पुनवर्सन करतात. मराठा समाजाचे तरुण राजकारण नाही, तर भविष्य मागत आहेत. भविष्यासाठी हक्काचे आरक्षण मागत आहेत, तुम्ही ते देत नाहीत. तुम्ही माणुसकी शून्य झालात. तुम्ही मराठ्यांचे मुडदे पडू देऊ नका, असे ते म्हणाले. संयम सुटला तर मला महाराष्ट्रात वेगळे आंदोलन करावे लागले, असा इशाराही मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. जातीच्या लेकरांपेक्षा आम्हाला मोठे काही नाही. तुम्हाला काही द्वेष, राग असेल, तर तो नंतर बघा. गोरगरिबांच्या लेकरांनी काय केले? असा सवालही त्यांनी केला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.